जळगाव (प्रतिनिधी) भाजपा मंडळ क्र 1 शिवाजी नगर परिसरतर्फे आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सदर भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगर उपाध्यक्ष नगरसेवक राजेंद्र मराठे हे दरवर्षी एक रोप लाऊन त्याचे देखभाल व संगोपन करतात. शिवाजीनगर भागात अनेक ठिकाणी गेल्या ८ते १० वर्षा पासून राजेंद्र मराठे हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. कार्यक्रमाप्रसंगी श्री मोटरचे अध्यक्ष सचिन भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक राजू भाऊ मराठे, किशोर भाऊ चौधरी, संजू शिंपी सरचिटणीस, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश पुरोहित, कार्यालय मंत्री गणेश माळी कार्यालय मंत्री प्रकाश पंडित जी, स्वप्नील साखळकर, दीपक तायडे, जागीर ए खान, चेतन सावळे, रोहित धुमाळ, प्रशांत साळवे, जयु जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.