मुंबई (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबर रोजी जयंती आहे. हा दिवस सुशासन दिवस साजरा केला जातो. भाजप शुक्रवारी देशातील १९ ठिकाणांहून अधिक ठिकाणी कार्यक्रम साजरा करणार आहेत. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे.
दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ९ कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या कार्यक्रमात १ बटन दाबून ९ कोटी शेतकरी लाभार्थ्यांना १८ हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ होणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये थेट अनुदान दिलं जातं. २ हजार रुपयाप्रमाणं तीनवेळा ही रक्कम बँकेत जमा होते. पीएम किसान योजना लाँच केल्यानंतर मोदी देशातील शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरु असताना पंतप्रधान काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील ९ करोड शेतकऱ्यांना १८००० करोड रुपये सरळ बँक खात्यात ट्रान्सफर होणार आहेत. २५ डिसेंबरला एका क्लीकवर ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८ हजार कोटी रुपये ट्रान्सफर होतील असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. शेतकरी संघटनांनी सरकारचे कायदे समजून घ्यावेत. आम्ही खुल्या मनाने चर्चा करण्यास तयार आहोत. सरकार सर्वांच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी जमा होणारेय. आज दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बटन दाबून शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेचा पुढील हप्ता हस्तांतरित करतील. या कार्यक्रमाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ राज्यातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधणारेत. पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपयांचा निधी केंद्र सरकारतर्फे दिला जातो. ३ हप्त्यांत २ हजार रुपये दर ४ महिन्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जातात. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा जमा केले जातात.
















