फत्तेपूर (प्रतिनिधी) शासकीय नियमानुसार सकाळी भरलेला बाजार बंद करण्यासाठी गेलेला असताना पाच फळविक्रेत्यांनी पोलीस हवालदारास मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. तर अन्य चार जण फरार झाले आहेत.
याबाबत वृत्त असे की, पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे हे बाजारात अकरानंतर दुकाने बंद करा सांगण्यासाठी सहकारी दिनेश मारवडकर, होमगार्ड यांच्यासह गेले होते. या दरम्यान अरशद युसूफ पठाण, युसूफ खाँ शब्बीर खाँ पठाण, मेहमूद खाँ शब्बीर खाँ पठाण, एजाज पठाण, मोहसिन मेहमूद पठाण हे सर्वजण अंगावर धावून आले व मारहाण केली. सुरवाडे यांच्या डाव्या हाताच्या दंडावर जखम झाली आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल पहूरचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना कळविले असता ताबडतोब फौजफाटा घेवून घटनास्थळ गाठले. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पोलिसावर हल्ला करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी पोलिसांनी अरशद युसूफ पठाण यास अटक केलेली असून अन्य चार जण फरार आहेत. पुढील तपास पहूर व फत्तेपूरचे पोलिस करीत आहेत.