जळगाव (प्रतिनिधी) राज्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक (मुंबई) यांनी पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी राबविलेल्या भरती प्रक्रियेत सुधारणेचे निर्देश देत, ज्या उमेदवारांनी फक्त एकाच जिल्ह्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांना तीन आठवड्यात नियुक्ती चे पत्र देवून सुधारित यादी जाहीर करावी, असा महत्वपूर्ण निकाल न्यायाधिकरणाच्या मुंबई, नागपूर व औरंगाबाद च्या खंडपीठाने दिला आहे.तीन खंडपीठाने एखाद्या नोकर भरती प्रक्रिये संदर्भात दिलेला हा निकाल बहुधा पहिलाच असावा.
या संदर्भात जळगाव येथील व सध्या मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड दर्शना आर. नवाल आणि ऍड प्रनव आव्हाड यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अतिरिक्त पोलिस महासंचालक, मुंबई यांनी ३० नोव्हेंबर २०१९ च्या जाहिराती द्वारे पोलिस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदाच्या भरती साठी भरती प्रक्रिया स्वतंत्र युनिट्स /जिल्ह्यांसाठी आयोजित केली होती. सुमारे ९८२७ उमेदवारांनी (अर्जदारांचा पहिला संच) जाहिरातीतील अटी व शर्ती चे उल्लंघन करीत एकापेक्षा जास्त युनिट/जिल्ह्यांसाठी फॉर्म भरले आणि परीक्षा ही दिल्या. अशा उमेदवारांची नावे जरी गुणवत्ता यादीत समाविष्ट केली गेली तरी एका पेक्षा जास्त ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले म्हणून भरती प्रक्रियेच्या अटी, शर्ती चे उलंघन केले म्हणून सुधारित गुणवत्ता यादीतून ते हटविण्यात आले. गुणवत्ता यादी तून वग ळण्यात आलेल्या उमेदवारांनी( अर्जदारांच्या पहिल्या संचाने) महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या कडे अर्ज दाखल करून सुधारित गुणवत्ता यादी ला आव्हान दिले. न्यायाधिकरणाने पुढील प्रक्रियेत उमेदवारी विचारात घेऊन त्यांच्या अर्जाना परवानगी दिली.
११ एप्रिल २०२२ च्या या आदेशा च्या अमलबजाणीमुळे ज्या उमदवारांनी एकच फॉर्म (उमेदवारांचा दुसरा संच) भरले होते, त्यांनी या आदेशावर आक्षेप घेत अर्ज दाखल केला. त्यामुळे हे प्रकरण मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या तीन खंडपीठात सादर करण्यात आले . या प्रकरणाची सुनावणी या तीन मोठ्या खंडपिठा समोर झाली, या खंडपीठाने १७ मार्च २०२३ रोजी निकाल दिला आणि ज्यांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज भरले होते अर्थात अर्जदारांचा पहिला संच च्या बाजूने जारी केलेल्या नियुक्त्या बाजूला ठेवत पोलिस आयुक्तांना निकालाच्या तारखे पासून तीन आठवड्याच्या आत सुधारित निवड यादी तयार करण्याचे आदेश दिले. पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर म्हणून नियुक्त केलेल्या उमेदवारांचा दुसरा संच, ज्यांनी या पदासाठी फक्त एका युनिट मध्येच अर्ज केला होता . या खटल्यात उमेदवारांचा दुसऱ्या संचाची बाजू ऍड प्रणव धर्मनाथ आव्हाड आणि ऍड. दर्शना रवींद्र नवाल यांनी खंडपीठात मांडली.