चाळीसगाव (प्रतिनिधी) शिव छत्रपतींच्या आगमनात कुठलेही पावित्र्य भंग होणार नाही याची काळजी घेऊन कठोर भूमिका घेतली म्हणून पोलीस प्रशासनाचे प्रातिनिधिक स्वरूपात शहर पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांची आज सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी भेट घेऊन अभिनंदन केले.
शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन झाले असता झालेल्या मिरवणूकीत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच सर्व पोलिस कर्मचारी अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला व शिव छत्रपतींच्या आगमनात कुठलेही पावित्र्य भंग होणार नाही याची काळजी घेऊन कठोर भूमिका घेतली म्हणून पोलीस प्रशासनाचे प्रातिनिधिक स्वरूपात शहर पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांची आज सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धन कार्याची देखील थोडक्यात माहिती पाटील यांना देण्यात आली. के. के. पाटील यांनी चाळीसगाव तालुका व परिसरात असलेल्या किल्ल्यांची देखील माहिती यावेळी उत्सुकतेने करून घेतली.