जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कंजरवाडा परिसरातील अवैधरित्या दारुभट्या लावून हातभट्टी दारु विक्रेत्यांसह निर्मात्यांवर पहाटे ५ वाजता एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकून १ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे दारू बनविण्याचे रसायन उध्वस्त करण्यात आल्या आहे. एमआयडीसी पोलीसात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत कंजरवाडा, जाखणी नगर, तांबापूर खदान, सिंगापूर या ठिकाणी धाडी टाकून रसायन व इतर साहित्य नष्ट करण्यात आले. यात बेबीबाई भारत बाटुंगे (वय ४६ रा. तांबापुरा), प्रेमाबाई गजमल कंजर (वय-५१ रा. जाखनी नगर) नीलमबाई गोपाळ बाटुंगे (वय-३० रा. तांबापुरा खदान), मुन्नीबाई देविदास बागडे (वय-४० तांबापुरा खदान) यांच्या कब्जातून जवळपास साठ हजारांचे कच्चे रसायन जप्त करुन नष्ट करण्यात आले. चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार राजेंद्र पाटील, संजय पवार,अनिल जाधव, अनिल इंगळे, प्रदीप पाटील, अनिल देशमुख, वसंत लिंगायत, गोरख बागुल, सुरज पाटील, पोलिस नाईक प्रवीण मांडोळे, सचिन महाजन, परेश महाजन, वैशाली सोनवणे यांचा सहभाग होता.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकातून निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यासह सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, उप निरीक्षक विशाल वाठोरे, रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, तुकाराम निंबाळकर, राजेंद्र सैंदाणे, गणेश शिरसाळे, सिद्धेश्वर लटपटे, नामदेव पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, साईनाथ मुंढे, सचिन पाटील, महिला पोलिस नाईक निलोफर सैय्यद, राजश्री बाविस्कर, आशा पांचाळ अशांचे पथकासह राखीव पोलिसांच्या फौजने जाखनीनगर कंजरवाडा भागाला वेढा दिला. रहिवासी साखरझोपेत आणि दारु निर्मीती करणारे कामात व्यक्त असतांना नुकत्याच सुरु केलेल्या दारुभट्ट्यासंह राखी राजु गुमाने, रेखा सुर्यभान कंजर, आशा सुनिल बाटुंगे, रिना धर्मा गुमाने, बिजनाबाई राजु बाटुंगे आदीविरुद्ध पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. संशयीतांकडून १ लाख ३२ हजार ५०० रुपयांचे कच्चे रसायन जप्त करण्यात आले.