धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड स्कुल येथे गांधीजींचा स्मृतिदिन व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. शिक्षिका भारती तिवारी यांनी ‘दे दी हमें आजादी, बिना खडग बिना ढाल…’ या गितातून गांधींजींना अभिवादन केले. शिक्षक लक्ष्मण पाटील यांनी ३० जानेवारी चे ऐतिहासिक महत्व सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करण्याऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. गांधीजींच्या मारेकऱ्यांनी गांधीजींना मारले परंतु त्यांनी दिलेला विचार ते मारू शकले नाहीत याचे शल्य त्यांना कायम आहे. ‘माणूस मारल्याने विचार मरत नाही’, असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले.
याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख, भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, शिरीन खाटीक, नाजुका भदाणे, दामिनी पगरिया, गायत्री सोनवणे, हर्षाली पुरभे, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार हे शिक्षकवर्ग तसेच इंद्रसिंग पावरा, सरला पाटील, शितल सोनवणे हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.