TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यातील ८६ हजार तर खान्देशातील ५ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा सुरू

वीजबिलांतून मुक्तता ; शून्य देखभाल खर्च

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ तर खान्देशातील ४ हजार ९१६ शेतकऱ्यांकडे तीन, पाच व ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सर्व शेतकऱ्यांना दिवसा विनाव्यत्यय वीजपुरवठा उपलब्ध झाला असून वीजबिलांतून देखील मुक्तता झाली आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्यांसाठी स्वतंत्र कृषिपंप वीजजोडणी धोरणाद्वारे मोठा वेग दिला आहे. यात प्रामुख्याने कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौर कृषिपंप योजनेचा समावेश आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी देखील या योजनेचा आढावा घेत विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

पारंपरिक पद्धतीने कृषिपंपाची वीजजोडणी न झालेले व महावितरणकडे वीजजोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून पारेषणविरहित नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहे. तसेच अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी सौर कृषिपंपाच्या आधारभूत किंमतीपैकी सर्वसाधारण गटासाठी १० टक्के तर अनुसूचित जाती/जमाती गटातील शेतकऱ्यांसाठी ५ टक्के लाभार्थी हिस्सा आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत एक लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातून आतापर्यंत २ लाख ४० हजार ६१७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९७ हजार ९ लाभार्थ्यांनी मागणी पत्राचा (डिमांड नोट) भरणा केला आहे तर ९६ हजार १९१ लाभार्थ्यांनी स्वतः निवडसूचीतील संबंधीत पुरवठादारांची निवड केली आहे. त्यातील ८५ हजार ९६३ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात २ हजार १०१, जळगाव जिल्ह्यात २ हजार ६८ तर धुळे जिल्ह्यात ७४७ असे खान्देशात ४ हजार ९१६ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत. तर आवश्यक कागदपत्र जोडलेले नसणे, स्थळ तपासणीनंतर कृषिपंपाची वीजजोडणी आढळून येणे, जलस्त्रोत नसणे, विहीर किंवा कूपनलिका ६० मीटरपेक्षा खोल असणे तसेच डिमांड नोट दिल्यानंतरही लाभार्थी हिस्सा न भरणे आदी कारणांमुळे १ लाख २४ हजार ६९२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

वीजयंत्रणेचे जाळे नसल्यामुळे व पारेषणविरहित असल्याने सौर कृषिपंपांद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. यासोबतच शेतकऱ्यांची वीजबिलातून मुक्तता झाली आहे. आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषिपंपासाठी ५ वर्ष व पॅनेलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखभालीचा खर्च देखील शून्य आहे. या योजनेची सर्व माहिती महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar/ या स्वतंत्र पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन उपलब्ध आहे तसेच प्रत्येक टप्प्यावर त्याबाबत अर्जदारांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येत आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

अखेर 'त्या' बेवारस जनावरांसंदर्भात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डेंग्यूमुळे एकुलत्या एक भाऊचा मृत्यू ; आई-वडिलांसह दोघं बहिणींचा काळीज चिरणारा आक्रोश !

September 15, 2023

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 25 एप्रिल 2024 !

April 25, 2024

भुसावळात बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा ; पथकाने पकडले रंगेहात !

February 9, 2023

‘बीएचआर’ घोटाळा : ‘वॉटर ग्रेस कनेक्शन’…नाशिकनंतर आता जळगाव महापालिका रडारवर !

December 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group