TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

थकबाकी न भरणाऱ्या कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा होणार खंडित

The Clear News Desk by The Clear News Desk
March 10, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खान्देशातील विविध कोविड रुग्णालयांकडे ८ कोटी ३७ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही या रुग्णालयांनी थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे आता नाईलाजास्तव या रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे महावितरणने म्हटले आहे.

कोविडच्या संकटातही महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला. यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. तेथे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने पूर्णपणे काळजी घेतली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील दोन वीजजोडण्यांची १ कोटी ८४ लाख ६४ हजार २४४ रुपये थकबाकी आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे १० लाख ६९ हजार ११३ रुपयांचे वीजबिल थकीत आहे. तर गोदावरी फाउंडेशनच्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे तब्बल ५ कोटी २२ लाख ७९ हजार ६३४ रुपयांचे वीजबिल थकीत आहे. धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडे ५३ लाख २९ हजार ९८९ रुपये तर शिरपूर येथील शासकीय रुग्णालयाकडे १५ लाख ४९ हजार ७९५ रुपये वीजबिल थकले आहे. नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे ५१ लाख ३ हजार १४२ रुपये वीजबिल थकीत आहे.

याबाबत दोन महिन्यांपूर्वी महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी या रुग्णालयांच्या अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून वीजबिलाची पूर्ण थकबाकी भरण्याचे आवाहन केले होते. थकबाकी भरण्यासंदर्भात वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांकडून कोणताही योग्य प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. कोविड-१९ आपत्तीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून, थकबाकी वसूल करण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवणे शक्य नसल्याने आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून थकबाकी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा कंपनी नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला होता. या पत्रांच्या प्रती जळगाव, धुळे व नंदुरबारचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांनाही पाठवण्यात आल्या होत्या. तथापि, महावितरणच्या आवाहनाला संबंधितांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे थकबाकीपोटी या रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

जळगाव हादरलं : नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शहीद दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना अभिवादन

March 23, 2021

अभिनेत्री कृती सेननला कोरोनाची लागण

December 9, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १७ फेब्रुवारी २०२३ !

February 17, 2023

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 18 सप्टेंबरपासून ऑनलाईन होणार

September 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group