TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त प्रबोधन शिबिर उत्साहात

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील मोठा माळी वाडा समाज मढीमध्ये १४८ व्या “सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिर” उत्साहात पार पडले.

प्रबोधन शिबिराचे प्रास्ताविक माळी समाजाचे पंच हेमंत ज्ञानेश्वर माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प महामंडलेश्वर भगवानजी बाबा होते. या प्रबोधन शिबिराचे उद्घाटन संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रबोधन शिबिराचे प्रमुख वक्ते औरंगाबादचे सत्यशोधक अरविंद खैरनार, धुळे येथील सत्यशोधक डॉ. सुरेश झाल्टे, अमळनेर येथील सत्यशोधक विश्वासराव पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगाव येथील सत्यशोधक भगवान रोकडे व कैलास जाधव यांची विशेष उपस्थित होती.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर धरणगावातील युवकांच्या हस्ते खंडेरायाची तळी भरून प्रबोधन शिबिराला सुरुवात करण्यात आली. आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचे माळी समाज पंच मंडळाच्यावतीने ग्रंथ देऊन स्वागत सन्मान करण्यात आले.

शिबिराचे प्रमुख वक्ते अरविंद खैरनार यांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा जीवनपट सांगून महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधक विचार आत्मसात करण्याची गरज आहे. आपली शिक्षण व्यवस्था निर्माण करून आपल्या महापुरुषांचे शिक्षण दिले पाहिजे, आपले सत्यशोधक विधी आपल्याच माणसाने करावे असे प्रतिपादन केले.

प्रबोधन शिबिराचे दुसरे वक्ते डॉ. सुरेश झाल्टे यांनी तात्यासाहेबांचा सत्यशोधक संस्कार अंगीकारला पाहिजे, इतिहासातले विविध उदाहरण दाखले देऊन युवकांना मंत्रमुग्ध केले. आपणच आपल्या लोकांसाठी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, आपल्याच लोकांच्या हातून सत्यशोधक विधी झाले पाहिजे, आपली वास्तुशांती, आपला विवाह सोहळा, आपले दशक्रिया विधी आपणच केले पाहिजे असे प्रतिपादन करून खंडेरावच आपले मूळ दैवत आहे असे उदाहरणासह स्पष्ट केले.

सत्यशोधक विश्वासराव पाटील यांनी महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे. वारकरी संप्रदायाची पताका पूर्ण देशभरात रोवणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज, राष्ट्रसंत तुकाराम महाराज व संत शिरोमणी सावता महाराज यांचे वास्तव – उदाहरण देऊन श्रोत्यांसमोर ठेवले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडलेश्वर भगवान बाबा यांनी आज सत्यशोधक चळवळ कळाली व खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ पुनरुज्जीवित झाली पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रबोधन शिबिराच्या शेवटी सत्यशोधक कार्यकारणी मंडळ घोषित करण्यात आली.

याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी, सचिव गोपाल माळी, डिगंबर महाजन, ज्येष्ठ सदस्य सुखदेव महाजन, दशरथ बापू महाजन, लोकनायक न्यूजचे संपादक, सत्यशोधक – जितेंद्र महाजन, कैलास पवार, सुधाकर मोरे, आकाश बिवाल, गोरख देशमुख, निलेश पवार, गौतम गजरे, जयेश महाजन, रामचंद्र माळी, कन्हैया महाजन, निवृत्ती माळी, शुभम माळी, विकास माळी, किरण महाजन, भावेश महाजन, लोकेश महाजन, समाधान महाजन, हर्षल गजरे, दिगंबर माळी, राहुल खैरनार, प्रल्हाद महाजन दिनेश महाजन, राहुल माळी, दीपक पाटील, दिपक मराठे, महादू अहिरे, श्रीराम माळी, योगेश तायडे, प्रकाश महाजन, कैलास माळी, विजय सोनवणे, भरत शिरसाठ, सुनील लोहार, महेंद्र तायडे, ललित मराठे, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, भरत मराठे, किशोर पवार, लक्ष्मणराव पाटील, आबासाहेब राजेंद्र वाघ व आदी बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबोधन शिबिराचे सूत्रसंचालन माळी समाजाचे पंच पी डी पाटील यांनी तर आभार सचिव गोपाल भास्कर माळी यांनी मानले. प्रबोधन शिबिर यशस्वीतेसाठी माळी समाज पंच मंडळाने परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
धरणगाव

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर…

January 26, 2026
Next Post

श्रीनगरातील हत्येचा मानियार बिरादरीतर्फे निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नातेवाईकांवर काळाचा घाला ; अपघातात १८ जणांचा मृत्यू

November 28, 2021

देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता : उच्च न्यायालय

July 9, 2021

जळगाव जिल्ह्याचा पारा 43 अंशावर !

April 25, 2025

*ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे ‘शिक्षक’ हे भावी पिढीचे शिल्पकार- रोहिणी खडसे*

September 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group