मुंबई (वृत्तसंस्था) भारतभर पत्रकार हितासाठी काम करणाऱ्या आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सल्लागार समिती अध्यक्षपदी आय बी एन १८ लोकमतचे विधीमंडळ तसेच मुंबई प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे तर प्रदेश अध्यक्षपदी सचिन शिंदे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. तसेच नियुक्तीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.
मंत्रालय विधीमंडळ व मुंबई येथे पात्रकारितेच्या माध्यमातून तसेच चाळीसगाव विकास मंचच्या माध्यमातून समाजसेवेचा ठसा उमटवणारे न्यूज रिपोर्टर प्रफुल साळुंखे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र प्रदेश सल्लागार समिती अध्यक्षपदी तसेच संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख सचिन शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी, राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोदजी वाचस्पती यांनी संयुक्त भारत तथा महाराष्ट्र प्रभारी अजयकुमार मिश्र, महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी (पाचोरा), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत कदम (चाळीसगाव), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर बोराटे (पाचवड), विधी व न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अँड. मंगेश तिरोडकर (मुंबई हायकोर्ट) यांचेशी विचारविनिमय करून नुकतीच नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे.
नियुक्ती बद्दल त्यांचे संयुक्त भारत तथा महाराष्ट्र प्रभारी अजयकुमार मिश्र, महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी (पाचोरा), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत कदम (चाळीसगाव), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर बोराटे (पाचवड), उत्तर महाराष्ट्र प्रमुख नरेंद्र पाटील (जळगाव), पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विक्रम सावंत (वाई), पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गोविंद गोळे, सातारा जिल्हा अध्यक्ष हिंदुराव पिसाळ पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष सतिशसिंग परदेशी, जळगाव जिल्हा अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी, पुणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
















