अमळनेर (प्रतिनिधी) राजकारण न करता फक्त समाजकारण करुन गोर गरिबांच्या व तळागळातल्या विद्यार्थी व लोकांची मदत करणारे पू.साने गुरुजीचा वसा टिकवून ठेवणारे पू.साने गुरुजी विदया प्रसारक मंडळांचे सचिव संदीप बाबुराव घोरपडे यांची टीडीएफ संघटनेच्या महाराष्ट्र राज्य खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल प्रगती गटाकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रगती शिक्षक सेना युती ग स सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील, हेमकांत अनंतराव पाटील, अध्यक्ष साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ अमळनेर, बन्सीलाल भागवत (केंद्रप्रमुख) राजेंद्र पुंडलिक सांळुखे, योगेश सनेर, संजीव पाटील, गोकुळ सांळुखे, दिलीप सोनवणे, राजेंद्र सोनवणे, धनजय सुर्यवंशी, संदीप वाघ, नामदेव आहिरे, अशोक ईसे, संजय पाटील, दिपक भामरे, जितेंद्र शेटे, धिरज पाटील आदी उपस्थित होते.