TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काँग्रेसला जीवदान देण्यासाठी प्रशांत किशोर यांचा मास्टर प्लान ; जाणून घ्या..काय आहे मास्टर प्लॅन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजकीय रणनीतिकार (Political Strategist) प्रशांत किशोर (Prashant Kishor) अर्थात पीके यांना मदतीसाठी काँग्रेसकडून पाचारण करण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून काँग्रेस पक्षामध्ये जोरदार मंथन सुरू आहे. पीके गेल्या चार दिवसांपासून सातत्यानं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेत आहेत.

गांधी कुटुंबानं पीके यांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी मार्ग मोकळा केल्याचं म्हटलं जातं आहे; मात्र त्यापूर्वी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची मतंही विचारात घेतल्याचं बोललं जात आहे. यामध्ये पी. चिदंबरम, जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अंबिका सोनी, रणदीप सुरजेवाला, ए. के. अँटनी, वीरप्पा मोईली, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या नेत्यांचा समावेश आहे. वीरप्पा मोईली यांनी तर प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये घेण्यास उघडपणे पाठिंबा दिला आहे. या सर्व नेत्यांसमोर प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्याची योजना तयार केल्याचं मानलं जात आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

काँग्रेसची स्पर्धा मोदी-शहा जोडीशी

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेत्यांना विविध गोष्टींची जाणीव करून दिली आहे. काँग्रेसची स्पर्धा मोदी-शहा जोडीशी आहे. मोदींची सध्याची लोकप्रियता पाहता त्यांना पराभूत करण्यास फार कष्ट करावे लागतील, ही बाजूदेखील पीके यांनी मांडली आहे. भाजपच्या यशात हिंदुत्व, तीव्र राष्ट्रवाद, तसंच मोफत रेशन, घर आणि शौचालय यांसारख्या कल्याणकारी योजनांचा मोठा हात आहे, हे नाकारता येणार नाही, असं पीके यांचं मत आहे. याशिवाय भाजपनं वेळोवेळी केलेली अध्यक्षांची निवड हादेखील मोठा फॅक्टर ठरला आहे. स्वातंत्र्यासाठी लढणारा काँग्रेससारखा पक्ष हळूहळू आपले आदर्श विसरला, असंही पीके यांचं मत आहे. भाजपनं काँग्रेसचे अनेक नेते फोडले आणि अनेक माजी नेत्यांच्या कामाचं श्रेय लुटलं. याउलट काँग्रेसला तर जवाहरलाल नेहरूंच्या बाजूनेही कधी म्हणावं तितकं बोलता आलं नाही, असं म्हटलं जातं. याच कट्टर राष्ट्रवादाला आपली ढाल बनवण्यास पीके काँग्रेसला सांगू शकतात, असं सांगितलं जात आहे.

काँग्रेस चालवण्याची आणि पंतप्रधानपदाची जबाबदारी दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडे दिली पाहिजे

प्रशांत किशोर यांच्या मते, काँग्रेस चालवण्याची आणि पंतप्रधानपदाची जबाबदारी दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडे दिली पाहिजे. म्हणजेच गांधी घराण्यातली एक व्यक्ती या दोन्ही पदांवर नसावी. याशिवाय, सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे काँग्रेसकडे 4.5 कोटी सदस्य आहेत. त्यापैकी 1.25 कोटी डिजिटली पक्षासोबत जोडलेले आहेत. ज्या काँग्रेसला 138 वर्षांचा इतिहास आहे, ज्या पक्षानं 50 वर्षांहून अधिक काळ देशावर राज्य केलेलं आहे, त्याची अवस्था आज अशी का झाली आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम पीके करणार आहेत.

काँग्रेसने लोकसभेच्या सुमारे 370 जागांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे

असं म्हटलं जातं आहे की, प्रशांत किशोर यांनी परिस्थितीचा सारासार विचार करून फोर एमचा आग्रह धरला आहे. मेसेज, मेसेंजर, मिशनरी आणि मेकॅनिक्स या चार घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. म्हणजेच एखादा ठराविक संदेश कोणती व्यक्ती कोणत्या मार्गानं लोकांपर्यंत पोहोचवणार यावर काम केलं जाणार आहे. या प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या डेटाचा पक्षाला जास्तीत जास्त कसा फायदा होईल, याची तजवीज पीके करणार आहेत. काँग्रेसनं हिंदू धर्म आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यामध्ये सहभाग न घेता फक्त तीव्र राष्ट्रवादाचा पुरस्कार केला पाहिजे. यासाठी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या तिरंगा यात्रेसारख्या अभियानांचा आधार घ्यावा लागला तरी चालेल, असा सल्ला काँग्रेस नेत्यांना पीके यांच्याकडून मिळाल्याचं म्हटलं जात आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशासारख्या काही राज्यांमध्ये काँग्रेसनं आपल्या रणनीतीत सुधारणा करावी आणि या राज्यांमध्ये युती टाळावी. काँग्रेसने लोकसभेच्या सुमारे 370 जागांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये युती करून निवडणूक रिंगणात उतरलं पाहिजे, असं प्रशांत किशोर यांनी सुचविल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या मते, प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सल्ल्यांनुसार संघटना अधिक प्रभावी होण्यासाठी बघेल यांनाही बैठकांमध्ये सामील करून घेण्यात आलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली सल्लामसलत येत्या 24 ते 48 तासांत पूर्ण होईल, अशी आशा सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

काम आटोपून घरी जाताना अपघात ; अवजड वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोटरी क्लब जळगाव ईलाइटतर्फे आयोजित ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप

September 9, 2021

सीए जळगाव शाखेच्या अध्यक्षपदी प्रशांत अग्रवाल

February 21, 2021

जळगाव : मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा !

May 9, 2024

‘मविप्र’ वाद : बंद घर उघडल्यावर पोलीसही चक्रावले !

January 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group