अमळनेर(प्रतिनिधी) भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शासनाकडून वेगवेगळ्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील जि.एस.हायस्कूल येथे नियोजनपूर्व बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली.
शालेय स्तरावर ७ ऑगस्ट ते १७ ऑगस्टच्या दरम्यान विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे काम यावेळी केले जाणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर यांनी सांगितले.यात निबंध स्पर्धा,क्रीडा स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, मॅरेथॉन,वक्तृत्व स्पर्धा,तालुक्याच्या ऐतिहासिक स्थळांची तसेच स्वातंत्र्य लढ्यात योगदान असलेल्या क्रांतिकारकांची माहिती मिळवणे,स्वच्छतेविषयी माहिती,मोबाइलच्या अतिवापरावर चर्चासत्र अशा वेगवेगळ्या स्पर्धा शाळेत आयोजित केल्या जाणार आहेत.
यावेळी सर्व विषयांवर सविस्तर चर्चा यावेळी झाली. क्रीडा विभागाचे प्रमुख एस.पी.वाघ यांनी शिक्षकांच्या समित्यांचे कामकाजाचा अहवाल सादर केला. यावेळी पर्यवेक्षक आर.एल.माळी,बी.एस.पाटील,जेष्ठ शिक्षक एस.बी.निकम,के.एस गायकवाड,ए.डी.भदाणे तसेच शिक्षक उपस्थित होते.