मेहुणबारे (प्रतिनिधी) ‘मी तुमचा नातलग आहे’ असे सांगून एका महिलेचा विश्वास संपादन करून १८ रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्थानकात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अनिल केशवराव देवकर (वय ४८ रा. जुनेगाव ब्राह्मणगल्ली सायगाव ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २२ मे २०२२ रोजी दुपारी १२.३० ते १.१५ दरम्यान अनिल देवकर यांची आई या घरी एकटी असतांना एक अनोळखी इसमाने अनिल देवकर यांच्या आईला मी तुमचाच नातलग आहे. मला अनिल काकांनी पैसे घेण्यासाठी येवला येथून पाठविले आहे असे सांगून अनिल यांच्या आईचा विश्वास संपादन केला. तसेच घरात दोन नंबरच्या रुममध्ये ठेवलेल्या पेटीमधील १८ हजार रुपये तसेच अनिल यांचे ओरीजनल मतदान कार्ड व आधार कार्डची झेरॉक्स प्रत घेत फसवणुक केली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्थानकात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मिलिंद शिंदे हे करीत आहेत.