नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात सर्वाधिक कुपोषित मुलं उत्तर प्रदेशमध्ये आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री स्वतःच स्वतःला नंबर वन म्हणत आले आहेत आणि “डबल इंजन”ची फसवाफसवी करून कुपोषणात उत्तर प्रदेशला नंबर वन बनले, असं ट्विट प्रियांका गांधींनी केलंय.
”संसदेत भाजपा सरकारच्या मंत्र्याने सांगितले की, देशात सर्वाधिक कुपोषित मुलं (जवळपास ४ लाख) उत्तर प्रदेशमध्ये आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री स्वतःच स्वतःला नंबर वन म्हणत आले आहेत आणि “डबल इंजन”ची फसवाफसवी करून कुपोषणात उत्तर प्रदेशला नंबर वन बनले.” अशा शब्दांमध्ये प्रियांका गांधींनी ट्विटद्वारे टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं कोरोना परिस्थिती हाताळण्यातलं अपयश लपत नाही अशा शब्दातही प्रियांका गांधी यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीला भेट दिली तेव्हा कोरोना परिस्थिती उत्तमपणे हाताळल्याबद्दल योगी सरकारचं कौतुकही केलं होतं. यावरुन आपल्या ट्विटमधून प्रियांका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.