जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्च्या जिवन्नोती अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘लखपती दिदी’ च्या मेळाव्यासाठी आज दि.२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगाव येथे येणार आहे. हा मेळावा दुपारी १२.३० वाजता जळगाव विमानतळा जवळील प्राईम इडस्ट्रीयल पार्क येथे होणार असुन मेळाव्यासाठी दिड लाख महिला येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असुन भव्य वाटरप्रुफ डोम उभारण्यात आला आहे. मेळाव्याच्याच पूर्वसंध्येला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज पाटील हे जळगावात दाखल झाले असुन त्यांनी कार्यक्रमस्थळी भेट देवून व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.
या कार्यक्रमात देशभरातील १०० सखी मधून दहा लखपती दिदीची निवड करण्यात आली असुन त्यांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच देशभरातील सहाय्यता गटांना २५०० कोटी झिरता निधीचे वाटप व ५ हजार कोटींचे बँक अर्थसहाय्य केले जाणार आहे. उपस्थित राहणार आहे. ‘लखपती दिदी’चा मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी ११ वाजता विमानतळावर दाखल होणार असुन १२ वाजता मेळाव्यास सुरूवात होणार आहे. या मेळाव्यासाठी केंद्रातील मंत्री, राज्यपाल, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासह जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मंत्री गिरीष महाजन, अनिल पाटील आदी उपस्थित राहणार आहे.
३५०० पोलिस अन् केंद्राचे सुरक्षा पथक !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या लखपती दिदी या कार्यक्रमासाठी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला असून सुमारे ३ हजार २०० पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात राहणार आहे. तसेच केंद्रातून देखील विषेश पथक तैनात करण्यात आले आहे. केंद्रातील सचिव, सहाय्यक सचिव यासह १०० अधिकाऱ्यांचे पथक तसेच राज्याचे सचिव, आयुक्तं विभागीय आयुक्त यासह बडे अधिकारी जळगावात ठाण मांडून आहे.
२२ तासासाठी नो फ्लाईंग झोन !
जळगावात आज पंतप्रधान येणार असल्याने दि.२४ रोजी ८ वाजेपासून तर २५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जळगाव विमानतळ परिघात ५० किमी पर्यंत नो फ्लाइंग झोन अर्थान उडड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधान दौऱ्यासंबधीत महत्वाच्या विमानसेवा मात्र सुरू राहणार आहे.
मोदीचा १०५ मिनीटांचा दौरा !
लखपती दिदी मेळाव्यासाठी पंतप्रधानांचा १०५ मिनीटांचा दौरा निश्चित झाला असुन सकाळी ११.१५ वाजता त्यांचे विषेश विमान जळगाव विमानतळावर दाखल होईल. त्यानंतर लखपती दिदीशी संवाद साधल्यानंतर ते दुपारी राजस्थानकडे रवाना होणार असल्याची माहीती मिळाली आहे.