TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नेपाळ अपघातातील 25 मृतांवर अंत्यसंस्कार ; जळगाव जिल्ह्यातील पाचही गावे शोकसागरात !

vijay waghmare by vijay waghmare
August 25, 2024
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) नेपाळच्या तनहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत नियंत्रण सुटल्याने बस कोसळून चालक-वाहकासह 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मन हेलावणारा हा अपघात शुक्रवार, 23 ऑगस्ट सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडला होता. मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर वायुदलाच्या विशेष विमानाने 25 मृतदेह शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव विमानतळावर दाखल झाले व तेथून 25 अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे हे मृतदेह मयतांच्या मूळ गावी भुसावळसह तळवेल, वरणगाव, दर्यापूर, जळगाव व सुकळी, ता.मुक्ताईनगर येथे नेण्यात आले. रात्री उशिरा मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वरणगाव शहरातून दहा तर तळवेल येथून एकाचवेळी सात जणांच्या अंत्ययात्रा निघाल्या. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूधारा तरळल्या. दरम्यान, अपघातात गोकर्णी सरोदे ही तरुणी पाण्यात बेपत्ता झाली असून अद्यापही तिचा शोध लागलेला नाही.

वरणगाव शहर काटेकोर बंद
भीषण अपघातात सर्वाधिक मृत भाविक हे वरणगावचे असल्याने शहरवासीयांनी शुक्रवारी दुपारनंतर व शनिवारी दिवसभर आपापली दुकाने बंद ठेवत मृतांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. वरणगावातील चार परिवारातील एकूण 13 जणांचा अपघात मृत्यू ओढवल्याने जावळेवाड्यात शोककळा पसरली आहे. शनिवारी दिवसभर शहरातील व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

आजी-माजी मंत्र्यांची वरणगाव-तळवेलला भेट
नेपाळ बस दुर्घटनेत वरणगावसह तळवेल भागातील सर्वाधिक भाविकांचा मृतयू ओढवला असून दोन्ही गावांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. शनिवारी दिवसभरात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी संबंधित कुटूंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन करीत धीर दिला.

वरणगाव-तळवेलची भोगावतीही ‘गहिवरली’
शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेनंतर वरणगावसह तळवेल या दोन्ही गावात स्मशान शांतता पसरली आहे. शनिवारी दिवसभरात या गावांमध्ये अपघाताची चर्चा दिसून आली तर नागरिकांकडून टीव्हीसह सोशल मिडीयाच्या बातम्यांमधून बातमी जाणून घेण्यात येत होती. दिवसभर नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांकडून मृत कुटूंबियांच्या सदस्यांना धीर देण्याचे व सांत्वणाचे काम केले जात होते. शनिवारी रात्री उशिरा रुग्णवाहिकेतून मृतदेह वरणगावसह तळवेल येथे आणण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला. रात्री उशिरा भोगावती नदीच्या काठावर अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वरणगावात बनवले दहा ओटे
वरणगावच्या स्मशानभूमीत एकाचवेळी सहा जणांवर अत्यसंस्कार करता येतात मात्र मृतांची संख्या पाहता पालिकेने तातडीने 14 ओट्यांचे काम हाती घेतले. अंत्यसंस्काराला होणारा उशीर पाहता स्मशानभूमीत जनरेटर व दिव्यांची व्यवस्था करण्यात आली.

25 मृतांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार
नेपाळ बस अपघातात वरणगावचे दहा, तळवेलचे पाच, भुसावळचे पाच, जळगावचे तीन व सुकळी, ता.मुक्ताईनगर येथील एकाचा मृत्यू ओढवला आहे. रात्री उशिरा मृतदेह संबंधित गावात रुग्णवाहिकेद्वारे आणल्यानंतर काही वेळेत लागलीच अंत्ययात्रा काढण्यात आली. जळगावातील तिघांपैकी दोघा मृतदेहांवर तळवेल येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली.

रात्री उशिरा मृतांवर अंत्यसंस्कार
बस अपघातात ठार झालेल्या जिल्ह्यातील 25 भाविकांचे मृतदेह वायुदलाच्या विशेष विमानाने जळगावात शनिवारी रात्री दाखल झाल्यानंतर नातेवाईकांकडून मृतदेहांची खातरजमा केल्यानंतर व शासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 26 रुग्णवाहिकेतून ते मयतांच्या मूळ गावी भुसावळसह तळवेल, वरणगाव, दर्यापूर, जळगाव व सुकळी, ता.मुक्ताईनगर येथे नेण्यात आले. रात्री उशिरा मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, अपघातात वरणगावातील गोकर्णी सरोदे ही तरुणी पाण्यात बेपत्ता झाली असून अद्यापही तिचा शोध लागलेला नाही.

लोकप्रतिनिधींची उपस्थिती
जळगाव विमानतळावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, मंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, भुसावळ तहसीलदार नीता लबडे, भुसावळ मुख्याधिकारी महेश वाघमोडे, डॉ.केतकी पाटील, उज्वला बेंडाळे, कस्टम विभागाचे अधिकारी, आदींची उपस्थिती होती. एकीकडे जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असताना प्रशासन व लोकप्रतिनिधींची लगबग असतानाही लोकप्रतिनिधींनी सुमारे दोन ते तीन तास विमानतळावर थांबून संवेदनशीलता दाखवल्याचे दिसून आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : पाळधीहून एकाला अटक ; धारागिर येथूनही लाखोची बनावट दारू जप्त ! 

January 24, 2022

भिवंडीतील तलावात तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू !

November 24, 2024

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी…

April 9, 2026

६४८ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी ; सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group