पुणे (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला आहे. मात्र, विरोधानंतर फेट्यावरील राजमुद्रा (Rajmudra) हटवण्यात आली आहे.
मुरूडकर झेंडेवाले यांनी हा खास फेटा मोदी यांच्यासाठी बनवला आहे. दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सांगण्यावरून फेट्यावर खास राजमुद्रा लावण्यात आली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना देण्यात येणाऱ्या शाही फेट्याला लावण्यात आलेली राजमुद्रा हटवण्यात आली आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या राजमुद्रेवरून अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शनिवारी या फेट्यावरून राजमुद्रा हटवून त्यावर सूर्यफूल लावण्यात आले आहे. यावरून कुठलेलेही राजकारण होऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात आली असल्याचे मुरुडकर फेटेवाल्यांकडून सांगण्यात आले आहे.
पुण्यातली मेट्रो प्रकल्प उद्घाटन, महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.