गांधीनगर (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आईचा आज 100 वा वाढदिवस आहे. त्या निमित्तानं पंतप्रधान गांधीनगरमधील त्यांच्या निवावस्थानी पोहचले आणि त्यांनी आईचा आशीर्वाद घेतला. गांधीनगर येथे भावाच्या घरी जात मोदींनी हिराबेन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या इतकंच नाही, तर मोदींनी हिराबेन यांचे पाय धुतले आणि त्यांनी एक खास गिफ्टही दिलं.
विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी 11 मार्च रोजी गुजरात दौऱ्यावर आले होते. यावेळी सुद्धा त्यांनी आईची भेट घेतली होती. आईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पुजा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी 100व्या वाढदिवसानिमित्त आई हिराबेन यांचे पाय धुतले आणि त्यांनी पुष्पहार घालून त्यांच्या चरणांना स्पर्श करत आईचा आशिर्वाद घेतला. इतकंच नाही तर, मोदींनी यावेळी आईला एक शालही गिफ्ट दिली. “वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत असल्याने आज आईची भेट घेत तिचे आशिर्वाद घेतले”, असं मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.