धरणगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अमळनेर शाखेची नुतन कार्यकारिणी नुकतीच जाहिर झाली असून कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी खान्देशातील सुप्रसिध्द साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. मसापचे नुतन अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी एका पत्रान्वये ही घोषणा केली. प्रा. चौधरी हे लेखक, कवी, व्यंगचित्रकार, पत्रकार, गझलकार, वक्ता म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांच्या या निवडीने त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची उचित दखल घेतली गेली आहे.
येत्या वर्षभरात मसापतर्फे गावागावात उपक्रम घेवून महाराष्ट्रातील संताच्या कार्याचा जागर करणे. स्थानिक लेखकांच्या पुस्तकांवर चर्चासत्र घडवून आणणे, तसेच राज्य नाट्यस्पर्धेसाठी नाटकाची निवड करून स्पर्धेत नाटक दाखल करण्याबाबत चर्चा करून ‘मसाप’ला प्रस्ताव पाठविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
प्रा. चौधरी यांच्या या निवडीचे अध्यक्ष संदीप घोरपडे, कार्याध्यक्ष रमेश पवार, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कोषाध्यक्ष उमेश काटे, उपाध्यक्ष भाऊसाहेब देशमुख, कार्यवाह विजया गायकवाड, सदस्य नरेंद्र निकुंभ, डॉ. रमेश माने, दिलीप सोनवणे, निरंजन पेंढारे, गोकुळ बागुल, शरद पाटील, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर मराठे, भारती सोनवणे, सुनिता पाटील, मनोहर नेरकर, मराठी वाडमय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, रणजित शिंदे, प्रा. शाम पवार यांनी अभिनंदन केले आहे.