पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील आडगाव येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडीकोयंडा तोडून ७० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना १७ रोजी घडली.
दरम्यान, १७ रोजी मध्यरात्री खेमराज लक्ष्मण शेलार यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटामधून सुमारे ७० हजाराची १० ग्रॅमची सोन्याची अंगठी लंपास केली. ही घटना पहाटे उघडकीस आली. याबाबत पारोळा पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पारोळा पोलीस करत आहेत.