TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव शहरातील महामार्ग चौपदरी कॉन्क्रीटचा प्रस्ताव ; नितीन गडकरींचे नागरिकांच्या शिष्टमंडळास आश्वासन !

प्रचंड कालावधीत रेंगाळलेल्या वळण महामार्गांची कामे पूर्ण करा !

vijay waghmare by vijay waghmare
September 2, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील महामार्ग क्र. ५३ चा पाळधी ते तरसोद या महामार्गादरम्यानचा जळगाव शहरातील बांभोरी ते गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतचा मार्ग चौपदरी पुर्णत: कॉन्क्रीटचा करावा. त्यानंतर तो शहराच्या संबंधीत यंत्रणेकडे हस्तांतरीत करावा. तसेच या महामार्गावर बांभोरीजवळ गिरणा नदीवर नव्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी प्रकल्प अहवाल तातडीने तयार करुन सादर करावा; अशा सूचना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या संबंधित यंत्रणेस दि. २७ ऑगस्टला दिल्यात. नितीन गडकरी यांनी जळगाव येथील मान्यवर नागरिकांच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून रस्त्यांचे विविध प्रस्ताव मान्य करण्यासंदर्भात सहमती दर्शविली आहे. जळगाव येथील नागरिकांचे हे शिष्टमंडळ जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या नेतृत्त्वात नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी गेले होते.

दरम्यान अतुल जैन यांनी जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांच्या संपर्क करून शिष्टमंडळ व नितीन गडकरी यांच्यातील झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसेच खासदार स्मिता वाघ यांची आज नवी दिल्लीत नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक असून जळगाव संदर्भातील महामार्गाच्या विविध विषयांवर धोरणात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रित येऊन शहर विकासाच्या विषयांचा पाठपुरावा करण्यासाठी जळगाव नागरिक मंच स्थापन केला आहे. या मंचने ज्येष्ठ पत्रकार तथा एनएचईपीचे संचालक उदय निरगूडकर यांच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्या प्रत्यक्ष भेटी संदर्भात विनंती केली होती. त्यानंतर जळगाव शहरातील महामार्गाशी संबंधीत समस्यांचे सविस्तर टिपण अशोक जैन यांच्या मार्गदर्शनात तयार करून उदय निरगुडकर यांच्याकडे पाठविले होते. त्यांच्या मध्यस्थीने नितीन गडकरींची भेटीची वेळ निश्चित झाली. या अनुषंगाने अतुल जैन यांनी जळगावच्या शिष्टमंडळासह दि. २७ ऑगस्टला नवी दिल्लीत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

जळगावच्या शिष्टमंडळात क्रेडाई संघटनेच्या राज्य शाखेचे उपाध्यक्ष अनिष शहा, कोगटा उद्योग समूहाचे संचालक प्रेम कोगटा, स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल्स लिमिटेडचे अध्यक्ष दीपक चौधरी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, मल्टिमीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुशील नवाल, पत्रकार दिलीप तिवारी यांचा समावेश होता.

अतुल जैन यांच्यासह शिष्टमंडळातील इतरांनी नितीन गडकरी यांना जळगाव शहरातील महामार्गाची सध्याची दुरावस्था, त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य, वाढलेल्या अपघातांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या जळगाव प्रकल्प अधिकाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा याविषयी सविस्तर माहिती दिली. महामार्ग चौपदरीकरणाचे सध्यस्तिथीतील रेंगाळलेले काम धुळे, पाळधी, तरसोद या ठिकाणी थांबलेले वळण महामार्गाचे काम, तसेच गिरणा नदीवरील प्रस्तावित पुलाचे न सुरू झालेले बांधकाम या विषयी वस्तुस्थिती दर्शक माहिती दिली. अतुल जैन यांनी नितीन गडकरी यांना आग्रह केला की, ‘जळगाव शहरातील महामार्गाचे क्रॉन्क्रीटकरण करताना ते थेट पाळधी बायपास ते तरसोद बायपास असे शहरातून करावे. हे काम करताना बांभोरी जवळ गिरणा नदीवर नवा पूलाचे बांधकाम करावे.’ यावर नितीन गडकरी ही म्हणाले की, ‘जळगावची ही गंभीर समस्या मला माहिती आहे त्यामुळे शहरातील महामार्गाचे क्रॉन्क्रीटीकरण नक्कीच करु तसेच नव्या पुलाच्या बांधकामासाठी कार्यवाही करु.’ हे सांगत असतानाच नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना मोबाईल वर कॉल करुन योग्य त्या सूचना दिल्यात.

नितीन गडकरी यांच्या सोबत झालेल्या चर्चेपुर्वी जळगावच्या शिष्टमंडळाशी त्यांचे स्वीयसहाय्यक अमोल बिराजदार-पाटील यांनी जळगावच्या महामार्ग विषयक समस्यांबाबत सविस्तर चर्चा करुन तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून सविस्तर टीपण तयार करून नितीन गडकरी यांना माहिती दिली होती त्यामुळेच नितीन गडकरींनी जळगावच्या प्रश्नांवर मुद्देसुद कार्यवाहीच्या तातडीने सूचना दिल्या.

शिष्टमंडळाने नितीन गडकरी यांच्यासमोर मांडलेल्या सूचना आणि त्यावर त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आदेश असे…

मांडलेला मुद्दा १ : धुळे ते तरसोद बायपासचे काम रेंगाळले आहे. त्यावरील धुळे, पाळधी आणि तरसोदजवळील वळण महामार्गाचे काम थांबलेले आहे. जर वळण महामार्गाचे काम लवकर पूर्ण झाल्यास जळगाव शहरातील वाहतुकीचे अनेक प्रश्न सुटतील.

नितीन गडकरी – संबंधीत अधिकाऱ्यांना कॉल करून आदेश दिले की, धुळे-जळगाव महामार्गाचे काम जर ठेकेदार वेळेत करीत नसेल आणि त्यात संबंधिताला आर्थिक अडचणी असतील तर त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि नव्या ठेकेदाराला हे काम द्या.

मांडलेला मुद्दा २ – जळगाव शहरातील महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झालेली असून अपघातांची संख्या वाढून त्यात मनुष्यहानी होत आहे. या महामार्गाचा विस्तार करुन त्याची उंची वाढवून दोन्ही बाजूस एलईडी पथदीप लावावेत, मोठ्या आकारातील गटारीचे बांधकाम करावे.

नितीन गडकरी – संबंधीत अधिकाऱ्यांना कॉल करून आदेश दिले की, ‘पाळधी ते तरसोद या महामार्गावर जळगाव शहरातील मार्गाचे काम हे चौपदरी क्रॉन्क्रीट करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. जळगाव शहरातील सध्याच्या महामार्गाविषयी प्रचंड तक्रारी आहेत. मी स्वतः जळगाव दौऱ्यावर गेलो तेव्हा त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे या महामार्गाचे चौपदरी कॉन्क्रीटीकरण करणे आवश्यक असून त्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. जळगाव शहरातील सुरक्षीत आणि टिकाऊ असा महामार्ग दुरुस्त करून तो संबंधीत यंत्रणेच्या ताब्यात देणे ही राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणची जबाबदारी आहे.

मांडलेला मुद्दा ३ – पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान ग्रीनफील्ड इकॉनोमिक कॉरिडॉर मंजूर झालेला आहे. या प्रकल्पात जळगावाचा समावेश करावा. त्याचे कार्यक्षेत्र जळगावपर्यंत वाढवावे. तसे केल्यास जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, व्यवसाय तसेच शेतीमाल व प्रक्रिया उत्पादन थेट इतर जिल्ह्यात व राज्यात पोहोचविणे शक्य होईल. जळगाव परिसरातील पर्यटन, हॉटेल, खासगी वाहतुक सेवा, दळणवळण सेवा वाढीस प्रोत्साहन मिळेल. भुसावळ येथील रेल्वेचा ड्रायपोर्ट आणि जळगाव विमानतळातील विस्तारणाऱ्या सुविधा यामुळे लघुउद्योग वाढीस प्रोत्साहन मिळून रोजगाराच्या संधी वाढतील.

नितीन गडकरी – संबंधीत अधिकाऱ्यांना कॉल करून आदेश दिले की, ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा सहभाग वाढविण्याची सूचना नक्कीच विचार करण्यासारखी आहे. या संदर्भात लवकरात लवकर प्राथमिक सर्व्हे करावा. अजिंठा जवळील वन विभागाच्या जमीनीचा काही भाग यात अडथळा आणू शकतो का ते तपासावे. जर वनविभागाचा काहीही अडथळा नसला तर ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा समावेश करण्याचा निक्कीच विचार करता येईल. ती बाब तपासून मला अवगत करावी.

वरील सर्व मुद्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळास सांगितले की, ‘जळगावच्या मागण्यांविषयी मी स्वतः सहमत आहे. जळगाव जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, व्यवसाय, लघुउद्योग शेतमाल आणि प्रक्रिया माल वाहतुकीसाठी ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉर नक्कीच उपयुक्त ठरु शकेल. महामार्गाशी संबंधित शहरातील मार्गाचे चौपदरी क्रॉन्क्रीटीकरण तसेच बांभोरी जवळचा पुल नव्याने बांधणे यावर लगेच प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देत आहे. वळण रस्त्यांची कामे लवकर करण्यासाठी संबंधित विभागास आदेश देत आहे.’ चर्चेनंतर शिष्टमंडळातील अतुल जैन यांनी जळगावकर नागरिकांच्या वतीने आभार मानले.

आज खासदार स्मिता वाघ यांच्याशी चर्चा
!

जळगाव शहरात महामार्गावर या आठवड्यात दोन महिला आणि एका वृद्धाचा बळी गेल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांना नागरिकांच्या रोषाला सामोरा जावे लागले आहे. त्यांच्यावर टिकाही होत आहे. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनीही मोर्चे काढले आहेत. या विषयी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी खासदार स्मिता वाघ यांना दिल्लीत नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसेच जळगाव शहरातील महानगराशी संबंधित विषयांबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली. दरम्यान खासदार स्मिता वाघ या आज दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
Next Post

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं तर विमानातून उतरवण्यात येणार

March 13, 2021

आता ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार रिंगणात

January 3, 2026

नवरात्री व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींना शालोपयोगी साहित्य वाटप

October 15, 2021

भोकर पुलाचे १३ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होणार भूमीपूजन ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती !

February 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group