बोदवड (प्रतिनिधी) येथे आज १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिननिमित्त ग्रामीण रुग्णालय बोदवड येथील आयसीटीसी विभागाच्या वतीने बोदवड येथील बस स्थानकात एचआयची एड्स बाबतच्या माहितीपर पोस्टर प्रदर्शनातून जनजागृती करण्यात आली.
यावेळी उपस्थिताना या आजाराबद्दल माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. जागतिक एड्स दिननिमित्त ग्रामीण रुग्णालय बोदवड येथील आरोग्य कर्मचारी यांना एड्स दिनाची शपथ देण्यात आली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपक जाधव व डॉ.अतुल पाटील होते . समुपदेशक विजय शिरसाट.लॅब टे्कनिशियन किशोर सोनवणे, लिंक वर्कर उषा पवार यांनी परिश्रम घेतले..हे पोस्टर प्रदर्शनास यशस्वी करण्यासाठी..बस स्थानकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले