धरणगाव (प्रतिनिधी) खानदेशातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रदीप देसले यांचे व्याख्यान १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, काँग्रेस नेते डी जी पाटील, शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, भाजपाचे नेते संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष भानुदास विसावे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, भाजप नेते वसंतराव बोलाने, इत्यादी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व सर्व शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तरी हजारोच्या संख्येने व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.