धरणगाव (प्रतिनिधी) पोलीस इन्स्पेक्टर किरण बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अत्यंत विकृत भाषेत वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई न झाल्यास सकल मराठा समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी धरणगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले.
धरणगाव पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुजोर विकृत मनोवृत्तीच्या बकालेचा सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध आणि धिक्कार करीत असून एखाद्या समाजाबद्दल अर्वाच्य टिप्पणी करणाऱ्या बकालेवर कारवाई करून त्याला निलंबित करावे अशी मागणी करीत आहोत. तसेच सदर अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास सकल मराठा समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनावर असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी पी.एम.पाटील, चंदन पाटील, जिजाबराव पाटील,गुलाब मराठे, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, योगेश पाटील, विजय पाटील,दीपक मराठे, प्रवीण मराठे, गोपाल पाटील, नंदकिशोर पाटील,प्रकाश मराठे, आनंद मराठे, रवींद्र मराठे, रामकृष्ण पाटील यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.