धरणगाव (प्रतिनिधी) सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार व हास्य व्यँग कवी एस.पी. कुळकर्णी लिखित’ तरंग’ या वात्रटिका-चावटीका संग्रहाचे प्रकाशन दि. 2 जुलै रोजी संपन्न होतं आहे.
या निमित्ताने निमंत्रितांचे कवी संमेलन होतं असूनज्येष्ठ कवी अशोक सोनवणे, प्रा. रमेश लाहोटी, प्रा वा.ना. आंधळे, प्रा. बी. एन. चौधरी, एस पी कुलकर्णी, पुरुषोत्तम पारधे यांचा सहभाग असेल. ‘तरंग’ चे प्रकाशन मान्यवर कवी, पत्रकार व सर्व उपस्थित सर्व काव्य रसिकांच्या हस्ते होईल. समारंभ विक्रम वाचनालय, धरणगाव येथे दु. 4 ते 6 या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन एस. पी. कुलकर्णी, विभाकर कुरंभट्टी (कृपा प्रकाशन) व डी.जी. पाटील यांनी केले आहे.