जामनेर प्रतिनिधी । शेतकर्यांना कर्जमाफी करण्यात आली, मात्र शेकडो शेतकरी त्यापासून वंचित असून जामनेर तालुक्यातील सुमारे ७२७ वर शेतकर्यांना त्यांच्या बँक खात्यासह अन्य तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफीपासून वंचित राहीले होते, तसा प्रस्ताव स्थानिक पातळीवरुन मंत्रालयात पाठविण्यात आला होता. अखेर माजीमंत्री तथा आ.गिरीश महाजन यांनी संबंधीत सहकार मंत्रालय आणि विविध शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करून त्यावरील सर्व शेतकर्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती स्वतः गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांना दिली.
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द, वाडी, मायेगाव, मांडवे, मोहाडी, सोनारी, भागदारा, वाकी, नांद्राहवेली, वाघारी आदी गावातील शेतकर्यांपैकी काहींची नावांत बदल, खातेक्रमांकात तफावत तर काहींच्या कर्जमाफीची रक्कम चुकीची दाखविण्यात येत होती. अशा विविध अडचणीमुळे तालुक्यातील ७२७ कर्जमाफीपासून वंचित रहावे लागले होते. आता वरील सर्व त्रुट्या दुर करण्यात आल्याने कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाल्याचेही महाजन यांनी सांगितले.
पुढे आ. महाजन म्हणाले की, त्याबाबत सुधारणायुक्त प्रस्ताव जिल्हा बँकेसह प्रशासनाच्या संबंधीत विभागाकडे पाठविण्यात येवून त्यासाठीची कर्जमाफिची रक्कम सुध्दा बँकेकडे तत्काळ वर्ग करण्यात आल्यामुळे या ७२५ वर शेतकर्यांना खर्या अर्थाने कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने समाधान वाटत आहे असेही महाजन यांनी सांगितले.