धरणगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या 67 लाखाची पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले. जय गुरुदेव आश्रमाच्या परिसरातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसून खर्दे बु. वहिवाटीच्या 3 किमीचा ‘दोनशे’ या शेत रस्त्याचा आणि परिसरातील शिव रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते धरणगाव तालुक्यातील खर्दे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.
या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन !
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून तलाठी कार्यालय व निवास बांधकाम -25 लक्ष, शासनाच्या मुलभूत (2515) गावांतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे – 5 लक्ष, जय गुरुदेव आश्रमांसाठी सामाजिक सभागृह 15 लक्ष, या कामांचे भूमिपूजन करण्यात आले तर मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतून रस्त्याचे काँक्रिटीकरण – 15 लक्ष, या लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविक ग्रा. पं. सदस्य समाधान कोळी यांनी केले. सूत्रसंचालन भांबर्डीचे सरपंच दगा शिलावट यांनी केले तर आभार लोकनियुक्त सरपंच कविता पाटील यांनी मानले.
यांची होती उपस्थिती !
खर्दे बु. येथील लोकनियुक्त् सरपंच कविता काशिनाथ पाटील, सोसा चेअरमन मंगला बाई बाविस्कर , माजी सरपंच कैलास पाटील, ग्रा.पं. सदस्य समाधान कोळी, जिजाब पाटील, महिला युवती तालुकाप्रमुख प्रिया इंगळे, कुणाल इंगळे, दिलीप पाटील, नथ्यू पाटील, किशोर इंगळे, सुरेंद्र नेमाडे , पुंडलिक इंगळे युवासेनेचे दिपक भदाणे, उगलाल पाटील ,जितेंद्र मराठे, भांबर्डीचे सरपंच दगा शिलावट, महेंद्र कोळी , जिवराम पाटील शिवाजी पाटील, पंढरी पाटील, प्रमोद पाटील, बैदास कोळी, गणेश कोळी , समाजसेवक बापू पाटील तसेंच पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















