अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या तिन्ही माध्यमिक शाळांच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल जगतराव पाटील यांची निवड झाली आहे. खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदाची निवडणूक २६ रोजी जी.एस. हायस्कूल येथे पार पडली. या निवडणुकीत एकूण सहा उमेदवार उभे होते. यापैकी सर्वाधिक मते घेऊन राहुल जगतराव पाटील विजयी झाले आहेत. संस्थेच्या कायम शिक्षक संघाच्या अंतर्गत ही निवड प्रक्रिया पार पडली. ७५ मतदारांपैकी ७२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. एक मत अवैध ठरले.
उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे —
१) राहुल जगतराव पाटील (विजयी) – २२
२) किरण प्रकाश सनेर – १७
३) अमितकुमार अशोक पाटील – १६
४) दिनेश नामदेव पालवे – ०८
५) रत्नमाला शालिग्राम सोनवणे – ०८
६) कल्पेश भालचंद्र सूर्यवंशी – ००
कायम शिक्षक संघाचे अध्यक्ष आर. जे. पाटील, सचिव उमाकांत हिरे, सदस्य के. आर. बाविस्कर, एल. सी. बंजारा, व्ही. एच. पाटील यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. राहुल पाटील यांच्या विजयाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
















