धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी गावातील शाम कॉलनीत सुरु असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्डुड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत मालकासह १६ जुगारींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ७ लाख २२ हजारांची रोकड व ५ लाख रुपयांचे मोबाईल असा एकूण १२ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा जुगार अड्डा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्षांच्या मालकीचा असून या कारवाईमुळे एकच खळबळ माजून गेली आहे.
धरणगाव तालुक्यातील पाळधीतील शाम कॉलनीतील एका घरात हायप्रोफाईल जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यांनी लागलीच उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ अक्रम शेख, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, नितीन बाविस्कर, सलीम तडवी, विनोद पाटील, विजय पाटील, रविंद्र चौधरी, रविंद्र कापडणे, सिद्धेश्वर डापकर, राहुल रगडे, रतन गिते, मयुर निकम, भारत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर यांचे पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्डयावर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास छापा टाकत कारवाई केली. पहाटेपर्यंत सुरु होती कारवाई
मध्यरात्री केलेली कारवाई
पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु होती. या कारवाईत १६ जुगारींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ७लाख २२ हजार २६० रुपयांची रोख रक्कम व ५ लाख २ हजार रुपयांचे मोबाईल असा एकूण १२ लाख २४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोळा जुगारींविरुद्ध गुन्हा दाखल
या कारवाईमध्ये क्लबचे मालक दिलीप शालीक पाटील (रा. पाळधी), शहा जमा जहीर शहा (खामगाव, अनिकेत अशोक भोसले (जळगाव), राकेश शामराव पाटील (रा. चोपडा), उमेश रामसिंग इंगळे (रा. खामगाव), रऊफ मेहबूब मन्यार (रा. पाळधी), शेख शाहरुख शेख युसुफ (रा. पाळधी, ता. धरणगाव), फारुख शहा युसुफ शहा (रोहाना ता. खामगाव), संतोष गजानन शिंगणापूरे (रा. खामगाव), विजय गोपीचंद पाटील (गोराडखेडा ता. पाचोरा), गणेश ऊर्फ वैभव अरुण धनगर (रा. चोपडा), गोपाल गणेश वावगे (रा. रोहाना ता. खामगाव), खेमचंद रुपचंद पाटील (रा. गाढोदा, ता. जळगाव), भुषण रामदास मोर (रा. जळगाव), सागर भिमराव कोळी (रा. जळगाव), अमोल मधुकर पाटील (रा. बाबरुड ता. पाचोरा) यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















