जळगाव (प्रतिनिधी) दिनांक १२ फेब्रुवारी रोजी रेल्वे बोर्डाची मान्यता प्राप्त असलेली AIRF(ऑल इंडिया मेन्स फेडशन)चे महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतभरातील DRM (डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर) व (GM)यांच्या कार्यालयासमोर रेल्वेमध्ये अप्रेन्ट्रीस युवक वर्गाला पक्का रोजगार मिळावा यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात भुसावळ येथे सुद्धा एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
रेल्वे मध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक वर्गाला पूर्वीप्रणाने Gm पॉवरनुसार पक्का रोजगार देण्यात यावा, रेल्वेचे होणारे प्रायवेटिकरण थांबवावे. रेल्वे बोर्डाने दिलेला २०% कोटा रद्द करण्यात यावा, अप्रेन्ट्रीस पूर्ण झाल्याच्या ६ महिन्याच्या आत पक्का रोजगार देण्यात यावा अशा मागणीचे पत्र डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांना देण्यात आले.
रेल्वे अप्रेन्ट्रीस युवक हे रोजगारपासून वंचित
रेल्वे अप्रेन्ट्रीस युवक हा ५ ते ६ परीक्षा देऊन पास होत असतात यात दोन ते तीन वर्षांचा कालावधी जातो पण इतकं असुन सुद्धा रेल्वे अप्रेन्ट्रीस युवक हे रोजगारपासून वंचित आहेत. स्किल इंडियाच्या नावाखाली युवक वर्गाची मोठ्या प्रमाणात फसवणुक सुरू आहे, स्कील इंडिया मुळे रोजगार तर मिळतं नाही पण दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे.
रेल्वे अप्रेन्ट्रीस यांना रोजगार नाही देऊ शकत असाल तर संपूर्ण देशातील आय टी आय बंद करण्यात यावे, स्कील इंडिया सुद्धा बंद करण्यात यावे जेणेकरून भारत सरकार पैसा वाचेल तसेच युवक वर्गाची स्कील इंडियाच्या नावाखाली होणारी फसवणुक सुद्धा थांबेल व कोणताही अप्रेन्ट्रीस युवक हा सरकारला कोणत्याही प्रकारचा रोजगार मागणार नाही. वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास संपूर्ण भारतभरातील रेल्वे अप्रेन्ट्रीस युवक वर्ग दिल्ली येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन करेल व या आंदोलनास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पियुष गोयल हे जबाबदार राहतील.
या आंदोलनात ऑल इंडिया रेल्वे ऍक्ट अप्रेन्ट्रीस असोशियएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी तसेच मोठ्या प्रमाणात बेरोजगार रेल्वे अप्रेन्ट्रीस युवा वर्ग भुसावळ येथे उपस्थित होता.