मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आज पोर्नोग्राफी केसमध्ये न्यायालयातून जामीन मिळाला. राज कुंद्राला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबईच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अखेर जामीन दिलासा मिळाला आहे. अश्लील चित्रपट प्रकरणात न्यायदंडाधिकारी कोर्टाने कुंद्रा याला आज जामीन मंजूर केला. त्यासोबत कुंद्राच्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन थॉर्प यालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर राज कुंद्रा याने पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. पुरवणी आरोपपत्रात माझ्याविरोधात काहीच पुरावा नाही, असा दावा करत कुंद्राने जामीन देण्याची विनंती केली होती. कुंद्रा याची विनंती मान्य करत कोर्टाने त्याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.