धरणगाव (प्रतिनिधी) राज्यातील ११ नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी आज बुधवार दि. ९ रोजी काढले आहेत. त्यानुसार धरणगाव नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून रामनिवास झवर यांची बदली झाली आहे.
आदेशात जुम्मा कासम प्यारेवाले यांची तुमसर येथे तसेच अमोल बागुल (एरंडोल), विजया घाडगे (शेवगाव जि.अहमदनगर), श्रीकांत लाळगे (लोहा, जि.नांदेड), निशिकांत गवई (यावल), रामनिवास झवर ( धरणगाव ), सचिन पूदाके ( बिलोली, जि.नांदेड ) सुरज जाधव जळगाव जामोद ( जि.बुलडाणा ), अंबादास गर्कळ ( मुक्ताईनगर ), अविनाश गांगोडे ( नवापूर, जि.नंदुरबार ), सचिन बच्छाव ( मुरुड जंजिरा जिल्हा रायगड या ठिकाणी पदस्थापना करण्यात आलेली आहे.
सदरील आदेश तात्काळ अंमलात येतील.सर्व अधिकाऱ्यांनी पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू व्हावे व तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा.तसेच सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून पदस्थापनेत बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास,ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक ) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लघंन करणारी असल्यामुळे,ती गैरवर्तणूक समजून त्यांच्या विरुध्द शिस्तंभग विषयक कारवाई करण्यात येईल,याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी,असेही आदेशात म्हटले आहे.