पारोळा (प्रतिनिधी) अँट्रासिटी तसेच छेडछाड केल्याबाबतचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एका मेडिकल दुकानदाराला ५० हजारांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात महेश धोंडू साळुंखे (वय ३१, रा. आदर्श नगर पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २८ एप्रिल २०२२ रोजी रात्री ८.०० वाजेच्या सुमारास गणेश छगन मरसाळे, समाधान वसंत मरसाळे, बापू मरसाळे, माधुरी समाधान मरसाळे (सर्व राहणार डी डी नगर पारोळा तालुका पारोळा) हे नॅशनल हॉयवे क्र. ६ वर रोड लगत असलेल्या शेतकी कॉम्प्लेक्स मधील राजमुद्रा मेडीकलवर आले. यावेळी समाधान मरसाळे हा मला उद्देशून म्हणाला की, तु थोड्या वेळा पुर्वी संजय वाणी यांचे आई एकविरा किराणा दुकानात गेला होता. त्यावेळी माझी पत्नी माधुरी हिचा पाठलाग करुन तिचेकडेस मोबाईल नंबर का मागीतला, असे बोलत असतांना मी व माझा भागीदार हरीष भोसले असे आम्ही दुकानाबाहेर आले. त्यांना समजवित असतांना समाधान यास बोललो की, मी तुझ्या पत्नीला या पुर्वी पाहीले नाही व मी तीला ओळखत नाही व मोबाईल नंबर सुध्दा मागीतला नाही. तेव्हा समाधान वसंत मरसाळे याने व त्याची पत्नी माधुरी समाधान मरसाळे तसेच गणेश छगन मरसाळे (वकील), बापु मरसाळे असे माझे मेडीकल समोर जमा झाले व चारही जणांनी मला शिवीगाळ व धमकी देवुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या सर्वांनी मला ५०,००० रुपयांची मागणी केली. नाही तर आम्ही तुझ्या विरुध्द अँट्रासिटी तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करु अशी धमकी दिली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.















