पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) तुम्ही वाळूवर गाडी पार्किंग करत जाऊ नका, त्यामुळे आमच्या वाळूचे नुकसान होते, असे बोलण्याचा राग आल्याने विवाहितेचा विनयभंग करत कानशिलात लगावल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ३० मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तूम्ही वाळुवर गाडी पार्किंग करत जाऊ नका, त्यामुळे आमच्या वाळूचे नुकसान होते, असे बोलण्याचा राग आल्याने डॉ. उत्पल कुंवर पाटील याने पिडीत महिलेस अश्लिल शिवीगाळ केली. पिडीता पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास जात असतांना धक्काबुक्की करुन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच तू जर माझ्या विरुध्द तक्रार दिली तर मी तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि प्रमोद कठोर हे करीत आहेत.