एरंडोल (प्रतिनिधी) एका ४५ वर्षीय महिलेंला मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेच्या घरी संशयित आरोपी संजय चितामण गायकवाड याने घरात घुसत अश्लील शिवीगाळ, मारहाण करीत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी पिडीत महिलेला सोडवायला मुलगा आला असता संशयित आरोपी संजय गायकवाड याच्या सोबत असणारे ३ जणांनी महिलेच्या मुलाला पकडून ठेवत मारहाण केली. या प्रकरणी संशयीत आरोपी संजय गायकवाड याच्यासह ३ जणांविरोधात एरंडोल पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील हे करीत आहेत.