जळगाव (प्रतिनिधी) आज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत दक्षिणमुखी हनुमान मंदिर, गुरुगृपा डेअरी, मोहन नगर महाबळ परिसरात भाजपा महानगरच्यावतीने रॅपिड अँटिजन-कोविड टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरातल्या नागरिकांनी शिबिराला उस्फूर्तपणे प्रतिसाद देत स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली. सुदैवाने या चाचणीत एकही नागरिक पॉझिटिव्ह आढळून आला नाही.
या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा शहराचे आमदार सुरेश भोळे (राजु मामा), महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या शिबिराचे आयोजन अमित साळुंके व युवा मोर्चा प्रसिद्धीप्रमुख गौरव पाटील यांनी केले. याप्रसंगी जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, महानगर चिटणीस राहुल वाघ, नगरसेवक जितेंद्र मराठे, मंडल क्र.९चे अध्यक्ष निलेश कुलकर्णी उपस्थित सहकाऱ्याने युवामोर्चाचे सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, रोहित सोनवणे, जयंत चव्हाण, प्रसाद पाटील, वैभव पाटील, उमेश पाटील, आकाश पाटील, स्वप्नील भंडारकर, यांच्यासह युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.