जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १५९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५२१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ०९, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ-११, अमळनेर-०४, चोपडा-०१, पाचोरा-१२, भडगाव-०७, धरणगाव-००, यावल-०२, एरंडोल-०२, जामनेर-०५, रावेर-०२, पारोळा-०१, चाळीसगाव-९७, मुक्ताईनगर-०२, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण १५९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४० हजार ८९२ पर्यंत पोहचली असून १३५ हजार २८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५५४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ३०४९ रुग्ण सध्या उपचार घेताय.