जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १६६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३९७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १४, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ-१६, अमळनेर-००, चोपडा-०३, पाचोरा-०७, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-१०, एरंडोल-६४, जामनेर-१४, रावेर-०३, पारोळा-०८, चाळीसगाव-१९, मुक्ताईनगर-०२, बोदवड-०२, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण १६६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३९ हजार ६६६ पर्यंत पोहचली असून १३० हजार ९५१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५२४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ६१९१ रुग्ण सध्या उपचार घेताय.