जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १५८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४९० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ०७, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ-१४, अमळनेर-०६, चोपडा-०२, पाचोरा-१६, भडगाव-०२, धरणगाव-०१, यावल-०८, एरंडोल-१९, जामनेर-०७, रावेर-०४, पारोळा-०२, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-०२, बोदवड-१२, इतर जिल्ह्यातील-०४ असे एकुण १५८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३९ हजार ९८५ पर्यंत पोहचली असून १३१ हजार ८७४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५३२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ५५७९ रुग्ण सध्या उपचार घेताय.