जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १२९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५४१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १४, जळगाव ग्रामीण-१४, भुसावळ-०१, अमळनेर-०१, चोपडा-०३, पाचोरा-०४, भडगाव-०३, धरणगाव-००, यावल-०३, एरंडोल-३३, जामनेर-०९, रावेर-०७, पारोळा-०८, चाळीसगाव-२२, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०३, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण १२९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४० हजार ७३३ पर्यंत पोहचली असून १३४ हजार ७६८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५५० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ३४१५ रुग्ण सध्या उपचार घेताय.