जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १९९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १०, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ-००, अमळनेर-०२, चोपडा-०२, पाचोरा-०२, भडगाव-०२, धरणगाव-००, यावल-०३, एरंडोल-००, जामनेर-०२, रावेर-०१, पारोळा-०३, चाळीसगाव-१६, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ४८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४१ हजार ८८६ पर्यंत पोहचली असून १३७ हजार ८८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५६८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १४३४ रुग्ण सध्या उपचार घेताय.