जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव हे कार्यालय ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या पुर्वपरवानगीने दि.19 ऑक्टोबर, 2020 पासून नवीन जागेत स्थलांतरीत झाले आहे.
कार्यालयाचा नवीन पत्ता पुढीलप्रमाणे –
जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय परिसर, महाबळ कॉलनी, जळगाव -425001. यापुढे कार्यालयाशी निगडीत पत्रव्यवहार नविन पत्यावर करण्यात यावा. असे सुहास रोकडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.