सोलापूर (वृत्तसंस्था) कर्ज बाजारी झालेल्या पतीच्या घरातील आर्थिक संकट दूर करतो, असे सांगून मंगळवेढा येथील २० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्ज बाजारी झालेल्या पतीच्या घरातील आर्थिक संकट दूर करतो, असे सांगून मंगळवेढा येथील २० वर्षीय महिलेवर पुणे जिल्ह्यातील ठाणगाव येथे नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी आप्पा कोळेकर महाराज त्याचा सेवक दत्ता सोनवा पासलकर यांच्याविरोधात मंगळवेढ्यात गुन्हा दाखल झाला आहे. पिडीत महिलेच्या पतीला व्यवसायामध्ये तोटा झाल्यानंतर कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते. त्यानंतर भोंदूबाबाने महिलेला वेगवेगळे आमिष दाखवत पिडीतेचा विश्वास संपादन करत अत्याचार केला. दरम्यान, या घटनेनंतर समाजात संतापाची लाट उसळली आहे.