मुंबई (वृत्तसंस्था) प्रख्यात नृत्य कलाकार अस्ताद देबू यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. त्याच्या कुटुंबियांनी ही माहिती दिली. ते 73 वर्षांचे होते. देबूच्या कुटूंबाच्या मित्राने सांगितले की तो रक्त कर्करोगाशी संबंधित लिम्फोमाशी झुंज देत आहे.
कथक आणि कथकली हे दोन शास्त्रीय नृत्यप्रकारांचा संगम साधत एका अनोख्या नृत्यशैलीची निर्मिती करणारे ख्यातनाम नृत्यकार पद्मश्री आस्ताद देबू (७३) यांचे गुरुवारी निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आधुनिक आणि जुन्या काळातील भारतीय नृत्यशैलींचा मेळ घालून नव्या पिढीसमोर एक वेगळी नृत्यशैली सादर करणाऱ्या देबू यांनी तब्बल पाच दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आस्ताद देबू यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाच्या मार्फत देबू यांच्या निधनाची बातमी दिली. देबू यांनी मुंबईत त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. ‘आपल्या अविस्मरणीय नृत्यांच्या वारसा मागे सोडून त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या सुंदर नृत्यशैलीतून प्रेक्षकांच्या मनात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने मित्रमंडळी, देश-विदेशातील शास्रीय आणि आधुनिक नृत्यातील सगळ्या कलाकारांसाठी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांची उणीव आम्हाला कायम जाणवेल,’ असे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्या ‘मीनाक्षी : ए टेल ऑफ थ्री सिटीज’ या सिनेमासाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शनही केले होते. १९९५ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कराने सन्मानित करण्यात आले होते, तर २००७ मध्ये आस्ताद देबू यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.