जळगाव (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गणांची आरक्षण सोडत आज सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली.
आज दुपारी १२.०० वाजता पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती जळगाव येथे विनय गोसावी, उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार ही सोडत चिठ्ठ्या टाकून करण्यात आली.
जळगाव पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निर्वाचक गणनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे —
गण क्रमांक 52 – कानळदा : अनुसूचित जाती महिला
गण क्रमांक 51 – भोकर : अनुसूचित जमाती
गण क्रमांक 55 – भादली बु. : नागरिकांचा मागास प्रवर्ग
गण क्रमांक 53 – ममुराबाद : अनुसूचित जमाती महिला
गण क्रमांक 57 – मोहाडी : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
गण क्रमांक 54 – आसोदा : सर्वसाधारण महिला
गण क्रमांक 56 – कुसुंबे खुर्दे : सर्वसाधारण महिला
गण क्रमांक 58 – म्हसावद : सर्वसाधारण
गण क्रमांक 59 – शिरसोली प्र.न. : सर्वसाधारण
गण क्रमांक 60 – धानवड : सर्वसाधारण
या सोडतीनंतर जळगाव तालुक्यातील राजकीय वातावरण निवडणुकीच्या तयारीकडे वळले असून संभाव्य उमेदवारांकडून तयारीस सुरुवात झाली आहे.
















