धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरुच असून आणखी दोन मोठ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील आणि युवासेना विभाग प्रमुख नितीन पाटील यांनी आपला राजीनामा दिला आहे.
माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये आज सकाळपासून राजीनामा सत्र सुरु झाले आहे. शिवसेना धरणगाव शहर राजेंद्र महाजन, उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील यांनी सकाळीच राजीनामा दिला होता. त्यानंतर आता साळवा-बांभोरी गटाचे युवासेना विभाग प्रमुख नितीन पाटील आणि युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील यांनी आपापले राजीनामे पाठवले आहेत. यानिमित्ताने धरणगाव तालुक्यात शिवसेनेला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. दरम्यान, दुपारनंतर आणखी काही पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे कळते.