जळगाव (प्रतिनिधी) किराणा घेण्याकरीता एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या रमेश हरचंद मोरे (वय ६६, रा. चंदूआण्णा नगर) वया सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे एटीएम मदतीचे बहाण्याचे अदलाबदल केले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून २५ हजार ७०० रुपयांची रोकड लांबविली. ही घटना दि. २९ रोजी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील चंदू आण्णा नगरात सेवानिवृत्त पोलीस अंमलदार रमेश मोरे हे वास्तव्यास आहे. दि. २९ रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मोरे हे दैनंदिन गरजेच्या वस्तूसह किराणा सामान घेण्याकरीता शहरात आले होते. त्यांनी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्याकरीता गेले. यावेळी इतर लोक देखील त्याठिकाणी पैसे काढण्यासाठी रांगेत उभे होते. पहिल्यांदा पैसे काढण्यासाठी मोरे हे एटीएममध्ये गेले, परंतू तेथून पैसे निघाले नाही. तयामुळे त्यांच्या मागे उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना पैसे काढण्यास मदत करीत त्यांना पीन टाकण्यास सांगितले. त्यानुसार मोरे यांनी पीन टाकला मात्र तरी देखील एटीएममधून पैसे न निघाल्याने त्या अनोळखी इसमाने एटीएम कार्ड रमेश मोरे यांना परत केले आणि त्यानंतर ते तेथून निघून गेले.
खात्री झाल्यानंतर दिली पोलिसात तक्रार
मोरे यांना खात्री झाली की, त्या अनोळखी व्यक्तीने पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेत त्यांनी फसवणुक केली. दरम्यान, त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तीन वेळा काढली रोकड
सेवानिवृत्त कर्मचारी रमेश मोरे हे घरी जाण्यासाठी निघाले ते ख्वॉजामिया चौकात पोहचले असता, त्यांना मोबाईलवर मॅसेज आले. यामध्ये त्यांच्या बँक खात्यातून तीन वेळा २५ हजार ७०० रुपयांची रोकड कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढून घेतली.
















