TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तळलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळावा ; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ज्या अन्न व्यासायिकांचा खाद्य तेलाचा वापर प्रतिदिवस ५० लिटरपेक्षा अधिक आहे, अशा व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नियम आहेत. त्यानुसार संबंधितांनी तेलाचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. तसेच तळलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी म्हटले आहे, खाद्य पदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणारे तेल हे फक्त एकदाच तळणासाठी वापरावे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत या तेलाचा वापर करून संपवावे. जर ते आपण पुन्हा तळण्यासाठी वापरले, तर त्यातील पोलर कंपाऊंडचे व ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढून ते आरोग्यावर विपरीत परिणाम करते. मुख्यत्वे सर्व वयोगटातील लोकांना तळलेले पदार्थ हे आकर्षित करतात. मुख्यत्वे कचोरी, समोसा, भजे, वडे, पाणीपुरी यासारख्या अन्न पदार्थाची मोठी मागणी असते. हे खाद्यपदार्थ सहज उपलब्ध असतात.

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

अन्न पदार्थ तळण्याकरीता वापरले जाणारे तेल हे पुन्हा- पुन्हा तळण्यासाठी वापरले गेले, तर त्यामध्ये पोलर कंपाऊंडस व bad cholesterol ट्रॉन्सफटचे प्रमाण वाढून त्यापासून हृदयविकार, कोलोन कॅन्सरचा धोका असतो. तसेच पंचनसंस्थेसंबंधी विकार उदभवण्याचा धोका असतो. त्यामुळे खाद्ययतेल पुनर्वापराबाबत काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

खाद्य तेलाचा तळण्यासाटी वापर करताना गॅस हा कमी आचेवर ठेवा म्हणजेच तेलामधून धूर येणार नाही याची काळजी घ्यावी. तळण्यासाठी शक्यतो स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा, लोखंडी कढईचा वापर टाळावा. तळताना तेलात जमा झालेले अन्न कण हे वारंवार तळून काळे होण्यापूर्वीच लगेचच काढावेत. तळलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळावा. शिल्ल्की राहिलेले तेल हे पुढील दोन दिवसातच भाजीला फोडणी घालण्यासाठी वापरुन संपवावे.

लहान- मोठ्या अन्न व्यवसायिकांनी म्हणजे ज्यांचा तेलाचा वापर प्रतिदिन ५० लिटरपेक्षा जास्त आहे अशा व्यावसायिकासाठी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासन या विभागामार्फत राबविल्या जाणा-या अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत काही नियम आहेत. मोठ्या अन्न व्यावसायिकांनी ते दररोज वापरत असणा-या तेलाचे रेकार्ड ठेवणे आवश्यक आहे. तसेच वापरुन किती तेल शिल्ल्क, शिल्लक राहिलेले तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायेडिझेल उत्पादकाला दिले त्यासंबंधी पूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्याचप्रमाणे तळण्यासाठीचे खाद्यतेलाचा पुनर्वापरावर निर्बंध घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत संबंधित अन्न व्यावसायिकांकडे जावून तपासणी करण्यात येते. टीपीसी मीटरच्या साह्याने तळण्यासाठी वापरत असलेल्या तेलाची तपासणी करुन जर TPC हे २५ टक्यांतूपेक्षा जास्त असेल तर अन्न व्यावसायिक पुढील कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात, असेही सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
Next Post

स्थानिक तक्रार निवारण समितीकडे दाखल करू शकतात तक्रार : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परिवारालाही दौऱ्यावर जाण्याची परवानगी मिळावी – गांगुली

October 30, 2020

धरणगावातून अज्ञात चोरट्याने लांबवली दुचाकी !

July 13, 2022

फडणवीसांच्या आशीर्वादाने बनावट नोटांचे रॅकेट सुरु होते : नवाब मलिक

November 10, 2021

चौकशा लावून विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद करता येणार नाही : फडणवीस

October 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group